liquor_delivery_by_amazon.in

आता AMAZON वरती मिळणार घरपोच दारू:

ऍमेझॉनला आता ऑनलाईन दारू विकण्यास परवानगी मिळाली आहे. ऍमेझॉन आता बिअर, वाईन इतर alcohol आणि स्पिरिट विकण्यास सुरुवात करणार आहे. पश्चिम बंगालमध्ये क्लीअरन्स मिळाला असून ऍमेझॉन आता डिलिव्हरी करण्यास सुरुवात करू शकेल आणि त्यानंतर इतर देशाच्या भागातसुद्धा लवकरच क्लीअरन्स नंतर होम डिलिव्हरी चालू होईल.

लॉकडाऊनच्या काळात दारूबंदी होती आणि सध्याच्या काळातही बऱ्याच ठिकाणी लोक सोशल डिस्टंसींग पाळत नसल्यामुळे दारूची दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहे. परंतु आता ऍमेझॉनला ऑनलाईन दारूविक्रीची परवानगी मिळाली असल्याने लोकांना ऑनलाईन ऑर्डर मागवणे जास्त सोयीस्कर होईल. ऍमेझॉन प्रमाणेच Bigbasket सुद्धा पश्चिम बंगालमध्ये ऑनलाईन दारू विकण्यास परवानगी मिळाली आहे.

परंतु संपूर्ण देशात ऍमेझॉन कधी दारू विकू शकेल ?

देशातील प्रत्येक राज्यात दारूविक्री करण्यासाठीचे नियम आणि धोरण वेगवेगळे असल्यामुळे प्रत्येक राज्य जसे जसे परवानगी देतील त्याप्रमाणे ऍमेझॉन दारू विक्री करण्यास सुरुवात करेल, सध्या मात्र पश्चिम बंगाल सरकारने ऍमेझॉनला ऑनलाईन दारूच्या डिलिव्हरीला परवानगी दिलेली आहे.

जेव्हा आपापल्या राज्यात ऍमेझॉन दारूविक्री सुरु करेल तेव्हा डिस्काऊंट मध्ये दारू मिळण्यास सुरुवात होईल हे नक्की!