corona | Covid-19

Covid-19 | कोरोना: संपूर्ण जग थांबविणारा व्हायरस!

२०२० साल इतकं भयानक असेल असं कोणाला स्वप्नातसुद्धा वाटलं नसेल. आधी निगेटिव्ह लोकांपासून दूर रहायला सांगितलं जायचं परंतु कोरोनामुळे पॉझिटिव्ह लोक सोडा सगळ्या लोकांपासूनच दूर थांबायला लागतंय. कोरोनामुळे फायदा झाला तो फक्त निसर्गाला, परंतु संपूर्ण मानवजात या जंतूमुळे पार शेकून निघाली.

गरीब- श्रीमंत दरी कायम तशीच राहिली. भारतात रोग आणला बाहेर असणाऱ्या आपल्या लोकांनीच परंतु त्याची झळ बसली ती फक्त गरीबालाच.

१-२ किलोमीटरसाठीसुद्धा आळशी झालेला माणूस मोटारसायकल,रिक्षा, कार वाहनांचा वापर करत होता पण अचानक कोरोनाचा इतका प्रभाव वाढला कि आपल्याच माणसांना हजारो किलोमीटर या व्हयरसने चालवले. अर्थातच श्रीमंत आधी पण बसूनच घरी बसून खात होता फक्त लॉकडाऊनमुळे त्याला कुठे फिरता नाही आलं. बहुत जणांनी आपआपल्या परीने सढळ हस्ते लाखो-कोटी रुपये देशाला दिले, परंतु आपले पोलीस आरोग्य कर्मचारी यांनी आपलं आयुष्यच देऊन टाकलं.

हा कोरोनायुक्त घाव मानवजातीवर इतका जोरात बसलाय कि कोरोनावरती जरी औषध आलं तरी आपली लवकरच सुटका होईल असं नाही. व्हॉट्स अँपच्या आधी फक्त SMS (सरळ मोबाईल संदेश) चालायचं परंतु आतासुद्धा SMS (सॅनिटायझर। मास्क। सोशल डिस्टंसिंग) चालवावं लागणार आहे.

माणसाला शिस्त लागली आणि हि शिस्त कायम टिकवली नाही तर विनाश लवकरच. विज्ञान खूप कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेलय पण या आपत्तीपुढे क्षणभर थांबलेच. निसर्ग मात्र न थांबता आपली वाढत चाललेली जखम भरत चाललाय.