box_office

चित्रपट हिट किंवा फ्लॉप कसा ठरवला जातो. तसेच बॉक्स ऑफिसचा हिशोब कसा केला जातो:

भारतात बॉक्स ऑफिस कलेक्शन कसे calculate होते हे तुम्हाला माहित आहे का?

वर्षाला सर्वात जास्त चित्रपट भारतात प्रदर्शित होतात. अर्थातच त्यातील मोजकेच चित्रपट सुपरहिट होतात तर काही सुपरफ्लॉप. काही चित्रपट त्यातील असणाऱ्या नायकांमुळे हिट होतात तर काही स्टोरीमुळे. काही चित्रपट तर गाण्यांमुळेसुद्धा हिट झालेले आपण पहिले आहे. सध्या Bollywood किंवा इतर प्रादेशिक भाषेच्या चित्रपटांमध्येसुद्धा जणू जीवघेणी स्पर्धाच चालू आहे. साध्याचीच सुशांतसिंग राजपूतचिच घटना ताजी आहे. हल्ली सुपरहिट या शब्दापेक्षा १०० करोड, २०० करोड क्लब अशा शब्दांची जास्त चर्चा आणि महत्व वाढले आहे.

प्रेक्षकसुद्धा रेटिंगला महत्व देण्यापेक्षा चित्रपटाला किती करोडची opening भेटली यावर लक्ष देतात. तसही हल्ली पेड रेटिंगचे जास्त फ्याड झाले आहे. काही प्रेक्षक (फॅनच म्हणूया) आपल्या आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट जास्त चालावा म्हणून "First Day First Show" ला महत्व देतात, इतकाच नाही तर काहीजण दोनपेक्षा अधिकवेळा सुद्धा चित्रपट पाहण्यात धन्यता मानतात.

पण हे सगळं चालू असताना चित्रपटाचा बिझनेस किंवा थेटर मालकाला कसा प्रॉफिट होतो. कलाकार किंवा प्रोड्युसरला कसे पैसे मिळतात याबाबतीत थोडं डिटेल्समध्ये पाहूया.

प्रोड्युसर:

प्रोड्युसर हे चित्रपटाच्या बजेटनुसार पैसे Invest करत असतात. प्रोड्युसरवर अभिनेत्यांचे मानधन व इतर टेक्निशियन, क्रू मेंबर, टेक्निशियन आदी. लोकांच्या मानधनाची जबाबदारी असते. तसेच चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर चित्रपट रिलीझ होण्याआधीचे प्रमोशन आणि ॲडव्हर्टाइझचा खर्च करतो.

डिस्ट्रीब्युटर:

प्रोड्युसर ते थेटरमधला दुवा म्हणजे डिस्ट्रीब्युटर. प्रोड्युसर सिनेमाचे "Theatrical हक्क" ऑल इंडिया डिस्ट्रिब्युटर्स किंवा थर्ड पार्टी डिस्ट्रिब्युटर्सना विकतात. डिस्ट्रिब्युटरचा फायदा कसा होतो ते आपण पुढे पाहूच. भारतात मुख्यत्वे एकूण १४ प्रकारच्या परिक्रमा (circuits) आहेत. मुंबई, दिल्ली, पश्चिम बंगाल ते केरळ सेंट्रल इंडिया असे विविध १४ सर्किट्स आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे प्रतिनिधी आहेत.

थेटर मालक:

प्रत्येक डिस्ट्रीब्युटरचे थेटर मालकाशी ॲग्रीमेंट असतात आणि डिस्ट्रिब्युटर्स थेटर भाड्याने घेतात. भारतात दोन प्रकारचे थेटर असतात सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स. दोन्ही प्रकारचे ॲग्रीमेंट हे वेगवेगळे असतात. हे ॲग्रीमेंट टोटल किती स्क्रीन भाड्याने घेत आहेत आणि प्रॉफिट या संदर्भात असतात. टोटल फायद्यामधून साधारण ३०% पर्यंत entertainment टॅक्स कापला जातो आणि प्रत्येक राज्यात विविध टक्क्यांनुसार टॅक्स घेतला जातो. डिस्ट्रिब्युटर्सना थेटर मालकांकडून फायदा दार आठवड्याला मिळत असतो.

Week 1 Week 2 Week 3 त्यानंतर
Multiplex 50% 42% 37% 30%
Single Screens 70% to 90% 70% to 90% 70% to 90% 70% to 90%

समजा मल्टिप्लेक्समध्ये तिकीटाची रक्कम आहे रु. १००/- आणि पहिल्या आठवड्यात १०० लोकांनी सिनेमा पहिला आहे. आणि थेटर जर १ आठवड्यासाठी बुक असेल तर 100 X 100 X 100 = 10,00,000/-. समजा ३०% टॅक्स प्रमाणे ३ लाख कट झाले तर उरतात ७ लाख रुपये. नुसार पहिल्या आठवड्यातील ५०% profit sharing प्रमाणे डिस्ट्रिब्युटरला ३.५ लाख आणि थेटर मालकाला ३.५ लाख प्रत्येकी फायदा मिळतो. अशा रीतीने प्रत्येक आठवड्यानुसार calculation होऊन फायदा विभागून घेतला जातो.