online_shopping_apps_India

ऑनलाईन शॉपिंग करताना घ्यायची काळजी:

आपल्याला ज्या हव्या त्या वस्तू डिस्काऊंटमध्ये उपलब्ध होत असल्यामुळे भारतीयांचा कल ऑनलाईन शॉपिंगकडे वळला आहे. बऱ्याच जणांना खूप चांगला अनुभव आला आहे तर काही जणांना खूप वाईट अनुभव येत आहेत. मोबाईल, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते घरातील किराणा मालापर्यंत सर्वच गोष्टी ऑनलाईन खरेदी करत असलात तरी कधी कधी ऑनलाइन शॉपिंग करणे धोकादायकही ठरू शकते. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात भारत सरकारने बाहेर फिरण्यापासून ते एकत्रित जमण्यापर्यंत निर्बंध लावले अर्थात आपल्या सुरक्षेसाठी. परंतु त्यामुळे ऑनलाईन कंपन्या सध्या खूप तेजीत आल्या आहेत तसेच फ्रॉड अँपसुद्धा या काळात गैरफायदा घेऊन ग्राहकांची आर्थिक लूट करत आहेत. ऑनलाईन शॉपिंग करताना डेटा चोरी होण्याचा जास्त धोका असतो आणि त्याचा परिणाम बँक संदर्भातली माहिती घेऊन हॅकर्स पैसे चोरू शकतात.

लोकांच्या आवडी-निवडीनुसार, सिझन आणि वयोगटानुसार वस्तूंची उपलब्धता आहे. त्यात गुगलसारख्या विद्यापीठात कोणत्या ग्राहकाला काय हवं याची पुरेपूर माहिती उपलब्ध होत आहे. गुगलमध्ये सर्च केलेल्या इनपुटनुसार गुगलबाबा कोणत्या ग्राहकाला काय हवं आहे, याचा सर्व्हे करतो. सर्च केलेल्या माहितीच्या आधारे गुगल निवडक जाहिराती ग्राहकाच्या मोबाईलवर दाखवतो. परंतु साईट सिक्युअर आहे कि नाही याची पडताळणी करूनच पुढे अकाऊंट रजिस्टर करून शॉपींग करू शकतो.

इमेल किंवा मोबाईलद्वारे अकाऊंट उघडताना पासवर्डसुद्धा strong असणे गरजेचे आहे. त्यानंतर आपले नाव, पत्ता डिलिव्हरीसाठी साईटवर्ती रजिस्टर होतो. ऑर्डर करताना पेमेंट डिटेल्स save होतात परंतु कोणत्याही परिस्थितीत क्रेडिट/ डेबिट कार्ड डिटेल्स किंवा पासवर्ड OTP कोणालाही सांगू नये. आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा 'पिन' देऊ नका, सीसीव्ही नंबर आणि कार्डच्या मागील सिक्युरिटी नंबर, ग्रीड नंबर देऊ नका ही सर्व माहिती तुम्ही स्वत: भरा. ऑनलाइन खरेदी करताना या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे, तरच तुमची संभाव्य फसवणूक टाळली जाऊ शकते.

अमेझॉन, टाटाक्लिक, फ्लिपकार्ट, e -bay, Myntra, Snapdeal अशा अनेक official वेबसाईटवरती आपण ऑनलाईन शॉपिंग करू शकतो.
Bigbasket

काय काळजी घ्याल:

  • बनावट वेबसाईटपासून सावध रहा.
  • अधिकृत वेबसाईटला प्राधान्य द्या
  • शक्यतो cash on delivery option ला प्राधान्य द्या
  • उत्पादन खरेदी करण्यापूर्वी इतर ग्राहकांनी दिलेले Reviews नक्की वाचा
  • ऑनलाईन पेमेंट करताना - क्रेडिट कार्डवरून ईएमआय करत असाल तर त्याचे हप्ते आणि कालावधी लक्षात घ्यावा. अन्यथा माहिती न घेतल्यामुळे सहा महिन्यांच्या परतफेडीवर घेतलेल्या वस्तूचे पैसे एकाच वेळी खात्यातून कट होतात.
  • शक्यतो डिलिव्हरी देणा-या व्यक्तीसमोर पार्सल उघडावे. डिलिव्हरी बॉयसमोर पार्सल उघडणे शक्य नसेल तर पार्सल उघडताना व्हिडिओ बनवावा. ज्यामुळे कंपनीकडून अथवा डिलिव्हरी देणा-या कंपन्यांकडून काही गफलत झाली असेल तर ती लक्षात आणून देण्यासाठी उपयोगी ठरेल.

कोणकोणत्या ऑफिशिअल वेबसाईट वरून शॉपिंग करणे Secure आहे याची लिस्ट खालीलप्रमाणे: